Maval : शिवनेरी ट्रेकर्सने पटकावले डोणे प्रीमिअर लीगचे विजेतेपद

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यातील डोणे गावात डोणे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी स्पर्धैसाठी एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता. शिवनेरी ट्रेकर्स विरूद्ध रायगड वॅारिअर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात शिवनेरी ट्रेकर्स संघाने बाजी मारली. शिवनेरी ट्रेकर्सने केलेल्या 4 षटकांत 1 बाद 45 धावांचा पाठलाग करताना रायगड वॅारिअर्स संघ सर्व गड्यांच्या बदल्यात फक्त 35 धावाच करू शकला.

यावर्षी शिवनेरी ट्रेकर्स, रायगड वॅारिअर्स,  लोहगड ट्रेकर्स आणि सिंहगड ट्रेकर्स  या संघांनी डोणे प्रीमिअर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. शिवनेरी ट्रेकर्स व रायगड वॅारिअर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात शिवनेरी ट्रेकर्स विजयी झाले. याप्रसंगी मालिकावीर लहु वाडेकर, सामनावीर अर्जुन खिलारी, उत्कृष्ट गोलंदाज विश्वास चांदेकर, उत्कृष्ट फलंदाज योगेश कारके या विजेत्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी पाचही संघाचे संघमालक तसेच चंद्रकांत चांदेकर, सरपंच शिवलिंग कुंभार, उपसरपंच पोपट वाडेकर, युवा उद्योजक किरण काळभोर, गणेश घारे, विशाल घारे,   काळूराम घारे, संतोष कारके उपस्थित होते. बक्षिस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन संस्थापक बाळासाहेब घारे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2