Vadgaon Maval : मावळ पंचायत समिती कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील मावळ पंचायत समिती कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सभापती, विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती विद्यमान सदस्य शांताराम कदम, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, विशाल कोतागडे, उपअभियंता सुरेश कानडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अंकुश देशपांडे, संताजी जाधव, प्रशासन अधिकारी मनोहर कांबळे उपस्थित होते.

 गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एक सर्वोत्तम राजा म्हणून त्यांची ओळख आहे. रयतेच्या स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न शिवाजी राजेंनी पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे सर्वांना समान न्याय देणारे, जातीभेद व धर्मभेद न मानणारे होते असे ही म्हाळसकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.