Ramdas Kadam : राज्यात फिरून दाखवाच, रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

एमपीसी न्यूज : दापोलीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. रामदास कदम यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जातोय. पुण्यात देखील आज रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन केले जाणार आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेच्या नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी टीका केली नाही. तरीही तुम्ही ठाकरे कुटुंबीयांच्या वैयक्तिक पातळीवर घसरता. सरड्यासारखे तुम्ही रंग बदलताय. कधीकाळी तुम्ही याच शिवसेनेचे संपर्कप्रमुख होता. तुम्ही आता राज्यात फिरून दाखवाच असा इशारा अंधारे यांनी दिलाय.

दरम्यान, रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टिकेनंतर राज्यभरातील शिवसैनिकांकडून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जात आहे. दापोली, रायगड, रत्नागिरी, ठाणे यासह राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, आज पुण्यात देखील रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष अधिक (Ramdas Kadam) तीव्र होण्याची शक्यता आहे.

Mission Baramati : भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्री आजपासून बारामती दौऱ्यावर, मिशन बारामतीला प्रारंभ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.