Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टीका अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर, वाचा काय झालं? 

एमपीसी न्यूज : शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि कट्टर शिवसैनिक म्हणूनही त्यांची ओळख आहे.. मात्र अलीकडेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. यावरूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला होता.(Uddhav Thackeray) शिरूर मतदार संघातील काही लोक ढळली पण खरी अढळ लोक माझ्यासोबत कायम आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटलांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टिकेला आढळराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मी पक्षाबरोबर अठरा वर्ष आढळच राहिलो. मी ढळलो नव्हतो. पक्षानेच मला ढळायला लावले असे म्हणत आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. गरज नसताना चुकीच्या माणसाच्या रिपोर्टिंग नंतर माझी पक्षातून हकालपट्टी झाली. असं सांगत उद्धव ठाकरेंचा तो घाव वर्मी लागल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. शिवसेनेत अनेक वादळ आली अनेकदा संघर्ष करावा लागला परंतु त्याही परिस्थितीत मी शिवसेनेबरोबर आणि बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो. सलग अठरा वर्षे मी उद्धव ठाकरेंना साथ दिली.(Uddhav Thackeray) मात्र त्या निष्ठेचा फळ काय मिळालं तर कुणाचं तरी ऐकून उद्धवजींनी माझी हकालपट्टी केली. हा सगळा प्रकार मला आवडला नाही तसाच महाराष्ट्रातील सर्वांना हा प्रकार आवडला नाही असं आढळराव पाटील म्हणाले.

Talegaon-Dabhade : हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार आवश्यक – डॉ. झंवर

शिरूर मतदार संघातील काही शिवसैनिकांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री च्या आवारातच या शिवसैनिकाशी संवाद साधला. तेव्हाच त्यांनी आढळराव पाटील यांच्यावर ही टीका केली होती. शिरूर मतदार संघात शिवनेरी किल्ला आहे..(Uddhav Thackeray) या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नयेत असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं होतं. ठाकरेंच्या याच टीकेला आढळराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.