Alandi News : आळंदीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सर्वपक्षीय अभिवादन

एमपीसी न्यूज :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असून त्यांचा आज जन्मदिवस आहे. (Alandi News) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत आळंदी मधील सर्व पक्षीय नेत्यांनी शिवतेज चौका मध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यासाठी आळंदी मध्ये शिवसेना (ठाकरे गट),भाजप,मनसे या पक्षाचे नेते या निमित्ताने एकत्र दिसले.अनेकां कडून आज त्यांचा जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. दरम्यान महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय आणि हक्कांसाठी बाळासाहेबांनी आवाज बुलंद करत शिवसेना पक्षाची सुरूवात केली.

Morwadi ITI : ‘उद्योजकता विकास’ कार्यशाळा संपन्न

शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी मराठी लोकांच्या हितासाठी (Alandi News) कणखर भूमिका घेतली.तसेच त्यांच्या विविध व्यंगचित्राच्या आठवणींना उजाळा दिला गेला.सोशल मीडिया याच्या माध्यमातून सुध्दा अनेकांनी अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.