गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Shivsena Crisis : शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडतंय; शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

एमपीसी न्यूज : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आले आहेत. सध्या हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मेळावा घेऊन पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. बाप पळवणारी टोळी म्हणून शिंदे गटाला हिनवले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आले आहे. उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी (Shivsena Crisis) तर थेट उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पक्षप्रमुखाला गटप्रमुखाची बैठक घ्यावी लागते. शिवसेनेच्या इतिहासात आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते असे ते म्हणाले.

शंभूराज देसाई गुरुवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद घेत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गटप्रमुखांचा मेळावा घ्यावा लागतोय. याआधी संपर्कप्रमुख आणि उपनेते, आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या बैठका घेत होते. त्यामुळे आम्ही घेतलेल्या भूमिकेने गटप्रमुखांचा थेट उद्धव ठाकरेंना भेटता येते असे म्हणून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

जनतेच्या आणि शिवसेनेतील अनेकांच्या मनात (Shivsena Crisis) नसतानाही महाविकास आघाडीची स्थापना झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी हे कधीच मान्य केले नसते. मात्र उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष शिवसेना कुणाच्या दावणीला बांधली असा सवालही उपस्थित केला. शिवसैनिकांना बोलायचे एक आणि करायचे दुसरेच; यामुळे आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असूनही आमदारांची कोंडी होत होती. ठरल्याप्रमाणे अनेक गोष्टी झाल्या नाहीत त्यामुळे अंतर वाढत गेले.

Jeevan Gaurav Award : संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

spot_img
Latest news
Related news