_MPC_DIR_MPU_III

Pune : शहरात शिवसेना दुखावली; हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघांत दिसून आली नाराजी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात 2 तरी जागा शिवसेनेला मिळाव्या, अशी मागणी सुरुवातीपासून भाजपकडे करण्यात आली होती. मात्र, भाजपने 2014 मध्ये सर्व जागा जिंकल्याने एकही जागा शिवसेनेला सोडणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचा फटका भाजपला वडगावशेरी, हडपसर, खडकवासला आणि काही प्रमाणात कसबा पेठ मतदारसंघांतही बसला.

_MPC_DIR_MPU_IV

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार, नगरसेवक विशाल धनवडे यांनी तब्बल 13 हजार 989 क्रमांक तीनची मते घेतली. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांना केवळ 28 हजार मतांनी विजय मिळविता आला. धनवडे यांची समजूत घातली असती तर टिळक यांचा विजयाचा आकडा 50 हजारांच्या आसपास गेला असता.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी खुद्द कोथरूडचा विकासाचे शिल्पकार शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रयत्न केले. तसे चित्र इतर मतदारसंघांत दिसून आले नाही. वडगावशेरी मतदारसंघात नगरसेवक संजय भोसले हे सुरुवातीपासून विधानसभेला इच्छुक होते.

युती होणार की नाही, याची कोणतीही शाश्वती नसताना त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. ऐनवेळी युती जाहीर झाल्याने भोसले यांची निराशा झाली. खडकवासला मतदारसंघात जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, हडपसर मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे इच्छुक होते. पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर मतदारसंघातही शिवसैनिकांची नाराजी होती. लोकसभेला गिरीश बापट यांचे प्रामाणिक काम केल्याने एक तरी जागा शिवसेनेला मिळणे अपेक्षित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.