Shivsena News : विरोधकांच्या एकजुटीसाठी शिवसेनेचा पुढाकार

एमपीसी न्यूज – भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे. दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे व एकमुखाने बोलावे एवढीच अपेक्षा आहे. विरोधकांच्या एकीची खिचडी न पकणे, विरोधकांची दहा तोंडे हेच भाजपचे बलस्थान आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधी पक्षांना एकजूट होण्याचं आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपले राज्य संभाळले तरी पुरे. आघाडीचे नेतृत्व कोणी करावे. पंतप्रधानपदाचा चेहरा कोण वगैरे नंतर पाहता येईल. आधी ईडी –पीडा टळावी यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढली, तर 35 जागा जिंकण्याचा विश्वासही अग्रलेखातून बोलून दाखविण्यात आला आहे.म्हणजेच मिशन 45 + ची स्वप्न पहात असलेल्या भाजपला एकप्रकारे 13 जागांवर रोखण्याचा निर्धारच शिवसेनेने केल्याचं दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.