Shivsena Melava : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एल्गार;

एमपीसी न्यूज : आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.(Shivsena Melava)मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असाही ठाम विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

 

मुंबई बळकावयाची आहे. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागली आहेत.  अमित शहा म्हणाले सेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे. अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे.

‘आमच्या आईवर वार करणा-याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. दस-यात लक्तरे काढणारच. कमळाबाईचा व मुंबईचा काय संबंध आहे. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलाय. वंशवाद कसला. मला अभिमान आहे घराण्याचा.’

’25 वर्षे आमची युतीत सडली. नालायक माणसं आम्ही जोपासली. वरती पोहचल्यावर लाथा मारायला लागलात. तुमचा वंश कोणता ? बाहेरचे उपरे किती घेतले तुम्ही. बावनकुळे की एकशे बावनकुळे. चित्ता करतो म्याव..चित्ता डरकाळी नाही फोडत. वरळी डेअरीच्या जागी जागतिक मत्स्यालय झाले पाहिजे. धारावीत आर्थिक केंद्र झाले पाहिजे.’ असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.

PCMC News : शहरातील 600 गृहनिर्माण सोसायट्यांना कर संकलन विभागाच्या नोटीसा

वेदांतावरुन आव्हान

वेदांतावरून धादांत खोटे बोलले जात आहे. वेदांता आणा,आम्ही तुमच्यासोबत येतो. मिंधे फक्त होय महाराजा म्हणत आहेत. दिल्लीत मुजरा घालायले गेलेत. संकटात धावून जाणारा शिवसैनिक असतो.

 

मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना आवाहन

आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतंय, मराठी – हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची देखील निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.