Pimpri: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना ‘डिस्चार्ज’

Shivsena PCMC Group leader Rahul Kalate discharged from covid19 hospital. राहुल कलाटे यांना 6 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण, त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, असे कलाटे यांनी सांगितले.

राहुल कलाटे यांना 6 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतले. आता त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. त्यात कलाटे म्हणतात, कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या काही दिवस होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे.

आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाच्या जोरावर मी यशस्वीरित्या आज घरी आलो. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे तसेच मला सदिच्छा देणाऱ्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.