Akurdi : शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुखांनी घेतला महिला आघाडीच्या कामाचा आढावा

एमपीसी  न्यूज  -प्रत्येक प्रभागात महिला आघाडीची शाखा असावी. लवकरच विभाग स्तरावर बैठक घेऊ  असे  मत शिवसेनेच्या  महिला संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी यांनी आज आकुर्डी येथे व्यक्त केले. 

नुकत्याच महिला पदाधिका-यांच्या  नियुक्त्या झाल्या. त्यांची ओळख परेड कार्यक्रमानिमित्त  त्या आज  (रविवार दि 19) आकुर्डी येथे बोलत होत्या. शहर महिला आघाडीच्यावतीने शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी त्यांचा सत्कार केला   यावेळी जिल्हा संघटिका सुशीला पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, रेखा दर्शिले  तसेच  वैशाली मराठे,  स्वरूपा खापेकर,  शशिकला उभे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर तसेच शहरातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या..
वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईतून महिला आघाडी कार्यरत आहे. मुंबईच्या धर्तीवर येथील महिला आघाडीने काम केले पाहिजे. उर्वरित पदे लवकर जाहीर करून प्रत्येक प्रभागात महिला आघाडीची शाखा असावी असेही त्या म्हणाल्या. या वेळेस  प्रथम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण  श्रद्दांजली वाहण्यात आली.  बैठकीत त्यांनी महिला आघाडीतील कामाचा आढावा घेतला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.