Kasarwadi : तांत्रिक बिघाडामुळे शिवशाही बसला आग

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर ते श्रीरामपूर बस कासारवाडी येथे मुक्कामाला होती. सकाळी श्रीरामपूरला जाण्यासाठी शिवाजीनगर येथे जात असलेल्या शिवशाही बसला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी सातच्या सुमारास पुणे-मुंबई जुना महामार्गावर कासारवाडी मधील कुंदननगर येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवशाही बस (एम एच 14 / जी यू 2310) ही बस शिवाजीनगर ते श्रीरामपूर जाणार होती. रात्री ही बस मुक्कामासाठी कासारवाडी येथे होती. या बसवर पप्पू अजित आव्हाड हे चालक म्हणून काम करतात. सकाळी शिवाजीनगरहून श्रीरामपूरला जाण्यासाठी पप्पू ही शिवशाही बस कासारवाडीहून शिवाजीनगर एसटी स्टँडवर घेऊन जात होते. सातच्या सुमारास बस कुंदननगर येथे आली असता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक बसने पेट घेतला. भर रस्त्यावर बस पेटलेली दिसल्याने स्थानिक नागरिक गणेश तापकीर यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली.

अग्निशमन विभागाला माहिती मिळताच तात्काळ मुख्य अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. बस मध्ये फक्त चालक होते. आग लागल्याचे समजताच चालक पप्पू बसमधून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाचे अशोक कानडे, अजय कोकणे, राजू काटकर, अक्षय पाटील, शांताराम घारे, शिवाजी चेडे यांच्या पथकाने ही आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879e005fee158722',t:'MTcxNDA0NDYzMy4xNzAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();