Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या विकासात ज्येष्ठांचे योगदान! – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी  न्यूज – “पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग होत आहे. ज्येष्ठांचे जीवन आनंदी व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करीन!” आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगून ज्येष्ठांसाठी समृद्ध वाचनालय असावे, अशी अपेक्षा  खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. 
आकुर्डी दत्तवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी  पिंपरी विधानसभा आमदार अॅड.गौतम चाबुकस्वार उपस्थित होते. यावेळी राहुल कलाटे, योगेश बाबर, सुलभा उबाळे, जावेद शेख, प्रमोद कुटे, मीनल यादव, धनंजय काळभोर, मधुकर बाबर, मारुती भापकर, उल्हास शेट्टी, जितेंद्र ननावरे, राजू मिसाळ, अमित गावडे, किरण मोटे, इरफान सय्यद, शंकर पांढारकर, रोमी संधू, सुरेखा कुटे याशिवाय ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवशक्ती नागरिक संघाचे संस्थापक-अध्यक्ष उत्तम कुटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संघाची पार्श्वभूमी सांगितली. पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणी विषयी आपले विचार मांडले. ह.भ.प.किसनमहाराज चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता आणि उपक्रमांची माहिती दिली. संघाचे सचिव सदाशिव डुंबरे यांनी स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम कुटे, लक्ष्मण सहाणे, किसन देशमुख, नारायण भुजबळ, निंबा चौधरी, सुदाम खेडकर, विष्णू ढेरंगे, विलास शिंदे, लक्ष्मण थोरात, सुभाष शेटे, तुकाराम गाडेकर, पांडुरंग बारटक्के, आनंद स्वामी, ह.भ.प.रामदास सहाणे, जयराम मोरे, बाळासाहेब सुपेकर, सोपान कुटे, शिवाजी नरवडे, यशवंत तरळ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल गावडे यांनी केले. संघाचे कार्याध्यक्ष आबा गायकवाड यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.