Maval News : शिववंदना ग्रुपच्या वतीने गडपालांचा सत्कार

एमपीसी न्यूज – तिकोना गडावर 13 ऑक्टोबर रोजी एकनाथ डामसे (रा. वाकड) हे पर्यटक चक्कर येऊन खाली पायरीवरून पडले असता, त्यांना खूप इजा झाली होती. शिवदुर्ग संघटनेचे गडपाल म्हणून जे शिलेदार होते त्यांनी डामसे यांना झोळी करून गडावरून खाली आणले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या तातडीच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले. गडपालांच्या या कामाची दखल घेऊन शिववंदना ग्रुपच्या वतीने त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यात आला.

जखमी एकनाथ डामसे यांना मदत सुजित मोहोळ अभिषेक राय, राहुल पाटील, विवेक रणदिवे, सचिन, गुरुदास यांनी केली. सत्कार करताना शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश ठोंबरे, तालुका अध्यक्ष तुषार वहिले, अशोक सातकर, मंगेश वाघमारे, कैलास पाटोळे, गडपाल सुजित मोहळ, गुरुदास मोहळ आदी उपस्थित होते.

सदरचे गडपाल शिवदुर्ग संस्थेच्या वतीने व गड भटकंती ग्रुपच्या वतीने गडावर नेमले आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिनही ऋतूमध्ये सदरचे गडपाल अतिशय चोखपणे काम करत असतात. गडावर येणारे हौशी पर्यटक जीव धोक्यात घालतात, काहींना अचानक भुरळ येऊन चक्कर येऊन पडतात, अशा जखमींना सदरचे गडपाल तातडीने मदत करतात आज पर्यंत 11 जणांचे प्राण वाचवण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे गडपाल सुजित मोहोळ म्हणतात. त्यांना या कार्यात प्रोत्साहन म्हणून शिव वंदना ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.