Shoaib Akhtar On IPL : क्रिकेटमधील आर्थिक असमानतेला BCCI आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ जबाबदार – शोएब अख्तर

BCCI and Cricket Australia responsible for economic inequality in cricket - Shoaib Akhtar :

एमपीसी न्यूज – भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असल्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मंकीगेट वादाकडे दुर्लक्ष करून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) हंगामाकडे आशेने पाहते, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीका केली. क्रिकेटमधील आर्थिक असमानतेला ‘BCCI’ आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ जबाबदार असल्याचेही तो म्हणाला.

T20 वर्ल्ड कप खेळता येऊ शकतो, असे सातत्याने आम्ही सांगत होतो. पण भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी तसं होऊ देणार नाही हे वाटत होतं आणि तसंच झालं.

आयपीएलचं कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये. आयपीएल झालंच पाहिजे मग त्यासाठी T20 वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, अशी भूमिका दिसून आली.

अशा प्रकारच्या स्पर्धेने लोक खेळाकडून लाखो डॉलर्स मिळवत राहतील, पण क्रिकेटची गुणवत्ता खाली जाईल, अशी खदखद शोएब अख्तर याने व्यक्त केली.

एखादा सामर्थ्यवान माणूस किंवा एक शक्तिशाली क्रिकेट बोर्ड जे धोरण ठरवतात, तेच होतं आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो.

वर्ल्ड कप आणि आशिया चषक यावर्षी खेळला जाऊ शकत होता. भारत -पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट पाहण्याची ती एक संधी होती, पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही, अशी टीका त्याने ICCवर अप्रत्यक्षपणे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.