Shoaib Akhtar On Sushant Singh: सुशांतच्या आत्महत्येवरून सलमानला दोष देणे चुकीचं- शोएब अख्तर

Shoaib Akhtar On Sushant Singh: It is wrong to blame Salman for Sushant's suicide: Shoaib Akhtar शाहरुख खानसुद्धा सामान्य कुटुंबातून आला आहे. त्याला तरी कुठे कोणी गॉडफादर नव्हता. सलमान खान सुद्धा सुपरस्टार झाला असेल तर त्याने त्यासाठी मेहनत घेतली आहे.

एमपीसी न्यूज- सुशांतसिंह राजपूत गुणी अभिनेता होता. त्याने धोनी चित्रपटात केलेली भूमिका अविस्मरणीय होती. मात्र डिप्रेशन खाली येऊन त्याने उचलेलं आत्महत्येचं पाऊल अयोग्य आहे. तसेच, त्याच्या आत्महत्येला सलमान खानला दोषी मानने चुकीचे असल्याचे शोएब अख्तर म्हणाला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनल वर संभाषण करताना असे म्हटलं आहे. अख्तर म्हणाला, सुशांतने एका सामान्य कुटुंबातून येऊन बॉलीवूडमध्ये जागा बनवली होती आणि ते फार कौतुकास्पद आहे.

कारण बॉलीवूडमध्ये टिकून राहणे फार कठीण असते व त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. महेंद्रसिंह धोनी चित्रपटात त्याने केलेली भूमिका मी पाहिली होती. त्याने धोनीची भूमिका हुबेहुब वठवली होती. तो खूप परिश्रम करणारा अभिनेता होता.

घराणेशाहीवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, शाहरुख खानसुद्धा सामान्य कुटुंबातून आला आहे. त्याला तरी कुठे कोणी गॉडफादर नव्हता. सलमान खान सुद्धा सुपरस्टार झाला असेल तर त्याने त्यासाठी मेहनत घेतली आहे.

त्यामुळे अपयश आले म्हणून खचून न जाता मेहनत घेत राहणे हाच पर्याय असल्याचे शोएब म्हणाला. तसेच सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान किंवा दुसऱ्या कुणाला दोषी मानने चुकीचे असल्याचेही त्याने नमूद केले.

सुशांतबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की, 2016 साली मुंबईत मी जेव्हा त्याला भेटलो त्यावेळी माझ्याशी बोलण्याचे त्याचे धाडस झाले नाही. तो माझ्या बाजूने डोकं खालच्या दिशेला करून निघून गेला.

तो त्यावेळी धोनीची भूमिका करणार असल्याचे मला मित्राकडून कळाले. धोनी चित्रपट हिट झाला, पण मुंबईतील त्या भेटीच्या वेळी मी त्याला थांबवून त्याच्याशी काहीच बोललो नाही याची मला खंत आहे.

मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्याला सांगितले असते. कदाचित ते अनुभव ऐकून त्याला त्याच्या जीवनात थोडा फायदा झाला असता. पण तसं घडलंच नाही. मी त्याच्याशी बोललो नाही याचा मला आता पश्चात्ताप होतोय, असे अख्तर म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.