Pimpri : शॉक बसून मुलाचे मृत्यूप्रकरण; कनिष्ठ अभियंत्याचे सेवा निलंबन रद्द

खातेनिहाय चौकशी सुरू

एमपीसी न्यूज – विद्युत विभागाच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे महापालिकेच्या विजेच्या खांबाचा शॉक बसून नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत विभागातील प्रभारी कनिष्ठ अभियंत्यावर करण्यात आलेली सेवा निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. सेवानिलंबनाऐवजी त्यांची आता खातेनिहाय चौकशी होणार आहे. 

_MPC_DIR_MPU_II

बापुसाहेब गोविंद रोकडे असे सेवानिलंबन रद्द केलेल्या प्रभारी कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. 26 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घराजवळ खेळत असताना महापालिकेच्या हायमास्ट विद्युत खांबाचा शॉक बसून हरीओम विनायक नराल (वय 9, रा. सेक्टर नंबर 22, निगडी) या मुलाचा मृत्यू झाला.

रोकडे यांच्याकडे वीजपर्यवेक्षकाच्या कामकाजाची जबाबदारी होती. या प्रकरणात विद्युत विभागाच्या कामकाजातील निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. त्यानुसार, रोकडे यांना सेवानिलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. मात्र, वीज महावितरणचा त्रोटक व अपुरा जबाब, विद्युत निरीक्षकांचा अहवालही प्राप्त झाला नाही. वैद्यकीय विभागानेही मुत्यूच्या कारणाबाबत निश्चित कारण स्पष्ट केले नाही. त्यामुळे या प्रकरणात नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने अभिप्राय देणे अडचणीचे असल्याचे नमूद केले. त्यानुसार, आयुक्तांनी रोकडे यांचे सेवानिलंबन रद्द करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.