Bhosari News : घरासमोर वाळत घातलेले कपडे काढताना बसला शॉक; मुलगी जखमी

एमपीसी न्यूज – घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत असताना वीजेचा शॉक लागल्याने 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी भोसरी येथे घडली.

अंकिता जयश्री काळे (वय 13, रा. गोडाऊन चौक, भोसरी) असे जखमी मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत होती. त्यावेळी घराजवळ असलेल्या डीपी बॉक्‍सचा तिला शॉक लागला. यात ती गंभीरपणे भाजली. तिला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.