Pune News : धक्कादायक! नामांकित रुग्णालयात तरुणीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

शिवाजीनगर परिसरातील नामांकित रुग्णालयात घडला प्रकार

एमपीसी न्यूज : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात ऑपरेशनसाठी ऍडमिट झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा वोर्डबॉयनेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर शैलेश मधुकर कांबळे (वय 30) या तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील नामांकित रुग्णालयात पीडित तरुणी दाखल झाली होती. तिच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाणार होती. तिला ऑपरेशन रूममध्ये नेल्यानंतर आरोपी वोर्डबॉयने तिच्या गुप्तांगाला हात लावून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.

या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.