Pune Crime News : धक्कादायक..! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

47 वर्षीय आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : महिला अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी पुणे शहर हादरले. 11 वर्षाच्या आणि 14 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शहरातील अप्पर इंदिरानगर आणि भवानी पेठ परिसरात या घटना घडल्या.

याप्रकरणी बिबवेवाडी आणि खडक पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एका 47 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

एक घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठेत गुरुवारी घडली. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी नमाज पठण केल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहात जात असताना 47 वर्षीय आरोपीने तिचा रस्ता अडवला. आरोपीने त्यानंतर त्या मुलीचे आणि तिच्या मित्राचे एकत्र असलेले फोटो तिला दाखवले. हे फोटो तिच्या आई-वडिलांना आणि ती रहात असलेल्या वस्तीतील इतर लोकांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

दुसरी घटना बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. यातील पीडित मुलगी अकरा वर्षाची आहे. तर आरोपीचे वय 15 वर्षे आहे. मुलगी आणि आरोपी दोघेही अप्पर इंदिरानगर परिसरात एकमेकांच्या घराजवळच राहतात. बुधवारी पीडित मुलगी घराच्या खिडकीत खेळत होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि तुझी खेळणी खाली पडली आहेत असे सांगून तिला खेळणी घेण्यासाठी खाली बोलावले. ती खाली आल्यानंतर तिला घेऊन तो जवळच्या गार्डन मध्ये गेला आणि तिचे कपडे काढून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.