Pune : धक्कादायक : कालव्याची भिंत खचायला केबल खोदाई कारणीभूत ?

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. 
कॅनॉलमधून मोठया प्रवाहाने बाहेर पडलेल्या पाण्याने दुचाकी-चारचाकी आपल्या कवेत सामावून घेत थेट रस्ता व्यापला आणि पलीकडेच असणाऱ्या झोपडपट्टीत पाणी घुसले, अचानक घुसलेल्या पाण्याने नागरिकांची भंबेरी उडाली. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की काही झोपडपड्या थेट वाहून गेल्या या बरोबरच काही नागरिक वाहून गेल्याची भीती येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र, याला अद्याप प्रशासनाने दुजोरा दिला नाही.

मात्र, ज्या ठिकाणी कालवा फुटला आहे त्या ठिकाणाची पाहणी केली असता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे. त्या ठिकाणी कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यात दोन केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या आहेत.
यात अतिशय धक्कादायक बाब म्हणजे या केबल कालव्याची भिंत खोदून टाकण्यात आल्याचे दिसत असून कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदल्याने त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.