Pune : धक्कादायक! प्रेमसंबंधात अडथळा बनणाऱ्या वडिलांचा मुलीने केला खून; आई आणि प्रियकरही सामील

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातून एक (Pune) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलगी आणि आईने कट रचून मुलाच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पित्याला संपवलं. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाऊनही टाकला. परंतु पोलिसांना एक पुरावा सापडला. आणि त्यानंतर पोलिसांनी तब्बल 223 सीसीटीव्ही कॅमेरे तपासात आरोपींना अटक केली. 

जॉन्सन कॅजिटन लोबो असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अग्नेल जॉय कसबे (वय 23, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय 43, गुड विल वृंदावन, आनंद पार्क, वडगाव शेरी) या दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जॉन्सन यांची मुलगी आणि आरोपी अग्नेल यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधाला जॉन्सन यांचा विरोध होता तर मुलीच्या आईचा पाठिंबा होता.

यातून दोघांच्यामध्ये भांडण व्हायचे. रोजच्या भांडणाला कंटाळून या तिघांनीही जॉन्सनचा कायमस्वरूपी काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी काही क्राईमच्या वेब सिरीज देखील पाहिल्यात. त्यानंतर 30 जूनच्या रात्री डोक्यात वरवंट्याने वार करून आणि मानेवर चाकूने वार करून जॉन्सनचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांनीही मृतदेह शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन जाळून टाकला.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांना अनोळखी मृतदेह सापडल्याने त्यांनी (Pune) तपासाला सुरुवात केली होती. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक वॅगनार कार त्यांना त्या ठिकाणी आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पुणे नगर महामार्गावरील 223 कॅमेरे तपासले आणि आरोपींचा शोध लावला.

खून झाल्यानंतर मयताची पत्नी काही झालेच नाही अशा अविर्भावात वावरत होती. तिने त्याच्या व्हाट्सअप वरून स्टेटस देखील बदलले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या एका पुराव्यावरून शोध घेतला आणि दोघांनाही अटक केली.

Vadgaon : डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी करणाऱ्या महिलांचा मनसेकडून सन्मान
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, पोलीस कर्मचारी जितेंद्र पानसरे जनार्धन शेळके अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर शिवणकर, चंद्रकांत काळे, सचिन होळकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.