TET Exam Scam : धक्कादायक! TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे समोर

एमपीसी न्यूज : पुण्यातील TET परीक्षा घोटाळ्यात (TET Exam Scam) आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका माजी मंत्र्याचे नाव समोर आले आहे. या माजी मंत्र्यांच्या दोन मुलींची नावे या घोटाळ्यांसोबत जोडली गेली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अपात्र असूनही नोकरी मिळवलेल्या 7880 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. हिना अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार या मुलींची नावे या यादीमध्ये आहेत. 

2019 साली झालेल्या शिक्षक पात्र परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे काही धागेदोरे पुणे पोलिसांना मिळाले होते. परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावे पैसे घेऊन पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसह इतरांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्या उमेदवारांना पैसे घेऊन पास करण्यात आले, अशांची देखील यादी तयार केली. तब्बल 7800 जणांची ही यादी आहे.

Kondhwa Police : महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना न्यायालयाचा दणका, वाचा काय झालं?

दरम्यान, या यादीत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आहेत. राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत 102 आणि 104 क्रमांकावर अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आहेत. त्या दोघीही सिल्लोडमधील एका संस्थेवर शिक्षिका आहेत. मात्र, त्या आता अपात्र असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

उजमा आणि हिना (TET Exam Scam) यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले? हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. या दोघींचीही टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय या यादीत संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी काही उमेदवारांचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.