Pune News : धक्कादायक ! गर्भवती महिलेला अमानुष मारहाण करत पाजले विष

उपचारा दरम्यान मृत्यू

0

एमपीसी न्यूज : भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सासरच्या नातेवाईकांनी एका गर्भवती महिलेला अमानुषपणे मारहाण करीत विषारी औषध पाजले. या घटनेत पीडित महिलेसह तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा ही मृत्यू झालाय.

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात हा प्रकार घडला. भिगवण पोलिस ठाण्यात या प्रकरणी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजन नितीन भोसले (वय 23) असे मृत्यूमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात हा प्रकार घडला. मयत हिला पती, सासू सासरे, यांनी तू आमच्या इथे राहू नको असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जबरदस्तीने तिला विषारी औषध पाजले. हे विषारी औषध पोटात गेल्यामुळे मयत महिलेला त्रास होऊ लागला त्यामुळे भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झालाय.

मृत महिलेची आई संतोषी काळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून याप्रकरणी आरोपी विरोधात खून आणि गर्भाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींना अटकही करण्यात आली. अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.