Chakan News : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; मुलीने दिला बाळाला जन्म

एमपीसी न्यूज – लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांनी मिळून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने बाळाला जन्मही दिला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

अक्षय पराजो खडे (वय 20, रा. ता. आंबेगाव), सुनील मधे (रा. ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अक्षय याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेच्या 12 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने व आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत चाकण जवळ घडला. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सुरुवातीला मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी चाकण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.