Pune : धक्कादायक! वारजेमध्ये रस्त्याच्या कडेला आढळले तीन दिवसाचे स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) वारजे येथील डुक्कर खिंड येथील रस्त्याच्या कडेला दोन ते तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याची घटना घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Pimpri : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वारजे येथील सर्व्हे नंबर 7/8 डुक्कर खिंड ते वारजे चौका दरम्यान सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या नागरिकांना दोन ते तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक दिसले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारजे (Pune)  पोलिसांना माहिती कळवली.

त्या माहितीच्या आधारे आमची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बाळाला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले असून बाळाची तब्येत उत्तम आहे.तसेच रस्त्याच्या कडेला बाळाला सोडणाऱ्या आई वडीलांचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती वारजे पोलिसांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.