Pune : जमिनीचा निकाल विरोधात गेल्याने ‘त्या’ तरुणांचा शोले स्टाईल स्टंट

तब्बल चार तास रोखून धरली पुण्याची वाहतूक

एमपीसी न्यूज : वडिलोपार्जित जमिनीच्या सुनावणीचा निकाल तहसिलदार कार्यालयाने विरोधात दिल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात (Pune) एका तरुणाने संचेती रुग्णालयाच्या पुलावर शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केला.

Maharashtra News : शेतकऱ्यांना मिळणार केवळ एक रुपयात पीक विमा

तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्याची मनधरणी करण्यात पोलिस,अग्निशमन व जिल्हाधिकारी प्रशासनाला अखेर यश आले. दरम्यान तब्बल चार तास वाहतुक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

महेंद्र डावखर (रा.सुल्तानपूर ता.जुन्नर) असे स्टंट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलोपार्जित जमिनी संदर्भात जुन्नर तहसिल कार्यालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये डावखर कुटुंबियांच्या विरोधात निकाल गेल्यामुळे नैराश्यातून महेंद्र याने आत्महत्येची धमकी देत हा स्टंट केला.

यावेळी महेंद्र डावखर म्हणाला की,तहसिलदार आणि प्रांत अधिकारी ग्रामस्थांची रखडलेली कामे करत नाहीत. वारंवार भेटून देखील कोणालाही दाद देत नाही. त्यामुळे नैराश्यातून मी हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.