Talegaon : चोरट्याशी झटापट करताना एकावर वार

एमपीसी न्यूज – चोरटे चोरी करून जात असताना घरातील नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी घरातील एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.1) पहाटे घडली.

सालिक तिहारी यादव (वय 27, रा. तळेगाव स्टेशन) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार शाकेत शेख (वय 20) आणि त्याचा एक साथीदार या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाकेत आणि त्याच्या साथीदाराने सालिक यांच्या घरातील 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ४ हजार रुपयांची रोकड चोरली. चोरी करून जात असताना सालिक आणि त्यांचे सासरे यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने सालिक यांच्या सास-यांच्या हातावर वार केले. यामध्ये सासरे जखमी झाले. दरम्यान, एक चोर पळून गेला असून दुसरा चोर त्यांच्या हाती लागला. त्याला सालिक यांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.