Maval News : आढले खुर्द गावात गोळीबार; एकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आढले खुर्द गावात आज (शुक्रवारी, दि. 21) सकाळी किरकोळ वादातून गोळीबार झाला. अविनाश शिवाजी भोईर या तरुणाने हा गोळीबार केला असून यामध्ये रोहन चंद्रकांत येवले गंभीर जखमी झाला.

जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.