Shooting started : आता ‘राजा रानीची जोडी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Now 'Raja Ranichi Jodi' will be coming soon

एमपीसी न्यूज – आता अनलॉक २ सुरु झाला आहे. आपल्याला करोनाच्या साथीने जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे मागील तीन महिने बंद असलेले मालिकांचे शूटिंग सुरु झाले आहे. सध्या घरातच बसणे अनिवार्य झाले आहे. अशावेळी घरातील सर्वांनाच मनोरंजनाचे काही तरी साधन लागतेच. त्यामुळे प्रत्येकजण सीरियल बघण्यासाठी उत्सुक आहे. झी मराठीवरील मालिकांना सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कलर्सवरील मालिका देखील सुरु होणार आहेत. ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

प्रेक्षकांची लाडकी संजू म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने पुन्हा शूटिंग सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणते, ‘इतक्या दिवसानंतर कॉल टाईमचा मेसेज बघून मला खूप आनंद झाला. मी स्वत: उत्सुक आहे, पुन्हा एकदा संजूला भेटण्यासाठी तर प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा अंदाज मी लावूच शकते. आम्ही सगळेच आतुर आहोत प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी. आम्हाला खात्री आहे आमच्यावरचे तुमचे प्रेम असेच कायम राहील.’

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रुम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. प्रेक्षकांनी मालिकेला भरभरुन प्रेम दिले आणि आता लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, श्रुती अत्रे, गार्गी फुले आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

मालिकेतील कलाकार दिवसातील जास्तीत जास्त वेळ सेटवरच असतात. आणि म्हणूनच सेट म्हणजे कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतं. मालिकेच्या संपूर्ण टीमशी घरोब्याचे संबंध तयार होतात. त्यामुळे सेटवरील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मंडळी तीन महिन्यानंतर झालेल्या भेटीनंतर थोडे भावूक झाले पण त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साहदेखील होता. चित्रीकरण सुरु झाले असून मालिकेची टीम आता प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. शूटिंगदरम्यान मास्क घालून वावरणे अनिवार्य असणार आहे, याचसोबत आवश्यक तितक्याच क्रूमेंबर्सच्या उपस्थिती चित्रीकरण पार पडणार आहे.

View this post on Instagram

@colorsmarathiofficial #rajaranichigjodi ❤️ #comingsoon

A post shared by shivani 💜 (@shivani.sonarofficial_) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.