_MPC_DIR_MPU_III

Shooting will start again: आता पुन्हा घुमणार लाईटस, कॅमेरा, अ‍ॅक्शन…

Shooting will start again: Now back to the lights, camera and action सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या चॅनेलवरील मालिका हा घरातील सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या या मालिकेत हे चाललंय, त्या मालिकेत ते चाललंय, मग आता त्या मालिकेत पुढे काय बरं होईल याचे तर्कवितर्क घरोघरी लढवले जात असतात. पण करोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे मागील तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं जुनेच भाग दाखवत होते किंवा जुन्या मालिकांचे पुनर्प्रसारण सुरु होते.

मात्र आता आपल्याला करोनासोबत जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काही अटींसह चित्रीकरणांना सुरुवात होत आहे. सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.   स्टार प्रवाहवरील वेगवेगळे विषय हाताळणा-या विविध मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैजू नंबर वन यांचे चित्रीकरण आता सुरु होणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे आपल्या सहकलाकारांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. ‘मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा प्रसारित झाला, तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आता शूटिंग सुरु झाल्यानंतर असणार आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती. त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे’, असं रेश्मा म्हणाली.

तर सर्वांची लाडकी आई म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर यांना सेट आणि सर्व सहकलाकारांची खूप आठवण येत होती. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ‘मनात प्रचंड उत्सुकता आहे. कधी एकदा सेटवर जातेय असं झालंय’, अशी प्रतिक्रिया मधुराणी यांनी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.