BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करून टोळक्याने पसरवली दहशत

397
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- दोन हजार रुपयांची खंडणी न दिल्याने टोळक्याने राडा घालत दुकानदाराला मारहाण करत दहशत पसरवली. रविवारी (दि.24) रात्री साडेअकराच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे ही घटना घडली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी लक्ष्मण वाघोजी दळवी (वय 75, रा. संत तुकाराम नगर, दिघी रोड भोसरी) यांनी फिर्याद दिली असून मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (वय 22, रा.मोरे वस्ती, चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे ( वय 24, रा. दिघी रोड,,भोसरी), विजय बहादुर थापा (वय 23, रा.लांडेवाडी भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा साथीदार अल्पेश मुरकर (रा.लांडेवाडी भोसरी) याच्यासह इतर तीन ते चार साथीदारांचा शोध सुरू आहे.

फिर्यादी दळवी यांचे दिघी रोड भोसरी येथे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी टोळके त्या ठिकाणी आले. दळवी यांना दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. दळवी यांनी नकार दिला असता त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सचिन फुगे यांना देखील मारहाण करून जखमी केले. त्यानंतर परिसरात आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेततिघांना अटक केली. त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक हंडाळ पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.