Shopping Site : ‘ह्या’ संकेतस्थळांवर शॉपिंग करणे ठरू शकते तापदायक

एमपीसी न्यूज: प्रजासत्ताक दिनाच्या पार्शभूमीवर विविध संकेतस्थळांनी सवलती देणे सुरू केले आहे. अशावेळी नागरिकांनी डार्क वेबच्या जाळयात अडकू नये, त्यापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी मुंबई पोलीसांनी बनावट संकेतस्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबई पोलीसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

दिल्या जाणा-या सवलती तुमच्या बॅंक खात्यात घुसू शकतात, असे सांगत मुंबई पोलीसांनी बारा बनावट संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे.

यांमध्ये shopiiee.com, whitestones.in, jollyfashion.in, fabricmaniaa.com, takesaree.com, republicsaleoffers.myshopify.com, kasmira.in, thermoclassic.site, efinancetix.com, fabricwibes.com, assuredkart.in. thefabricshome.com यांचा समावेश आहे. नागरिकांनी या संकेतस्थळांपासून सावधान राहावे, असे मुंबई पोलीसांनी सांगितले आहे. घरगुती वस्तू, कपडे इत्यादींची विक्री करणारी ही संकेतस्थळे आहेत.

अशा बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून तब्बल 22,000 पेक्षा अधिक व्यक्तींची 70,00,000 रुपयांची फसवणूक करणा-या माहिती तंत्रज्ञानातील तज्ञ इसमास मुंबई पोलीसांनी गुजरात येथून अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.