Pimpri : रक्षाबंधनासाठी वैविध्यपूर्ण राख्यांनी सजली दुकाने

एमपीसी न्यूज – भावा-बहिणीच्या अतूट नात्याची जाण करुन देणारा व पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण अवघ्या  दोन ते तीन दिवसांवर  येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात  बाजारपेठेत लहान-मोठ्या व्यावसायिकांनी वैविध्यपूर्ण राख्यांनी दुकाने थाटली आहे.

बाजारात यंदा विविध प्रकारच्या राख्या बघायला मिळत आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी कार्टून राख्यांनी वर्चस्व गाजवल्याचे चित्र दिसून येत आहे. मोटू-पतलू, मिनियन्स, अँग्री बर्ड, पोकेमॅन, भीम, डोरेमॅन, बाहुबली आदी असंख्य कार्टून राख्यांचा त्यात समावेश आहे. लहान मुलांसाठी स्पीनर राखी देखील खास आहे. राखीवर असलेल्या फिरत्या गोल चक्रामुळे स्पीनर आणि राखी असा दोन्हींचा आनंद मुलांना लुटता येणार आहे.
मोठ्यांसाठी देखील विविध प्रकारच्या आकर्षक आणि विविध डिझाईनमध्ये राख्या बाजारात उपलब्ध आहेत.

यामध्ये पारंपारिक असलेल्या देव राखींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर कुंदन राखी, म्युझिक, लुंबा, चांदी, डायमंड, गोल्डन, कपल आणि श्री राखी देखील बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये असलेल्या म्युझीक आणि कपल राखीला यंदा जास्त मागणी असल्याची माहिती विके्रत्यांनी दिली.चिंचवड येथील महावीर राखी या दुकानाच्या सीमा कुंकलोळ  यांनी राख्यांवर नेत्रदान श्रेष्ठदान हा संदेश देऊन नेत्रदानाची जनजागृती केली आहे.

गुरुवारी दि. १५ ऑगस्टला रक्षाबंधन सण आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात विविध आकार व प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. महिला व तरुणींची राख्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करणाऱ्या यंदा खास राख्याही बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.बंधुरायाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि हट के राखी बांधण्यासाठी राखीच्या खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरु झाली आहे, शहरात राख्यांचे स्टॉल उभारले आहेत. अवघ्या 1 रुपया पासून 250 ते 500 रुपयापर्यंतच्या आकर्षण राख्या बाजारात सध्या उपलब्ध झाल्या आहेत.

छोटा भीम, डोरोमॅनचाही प्रभाव…

स्नेहबंधनाचा धागा विविध आकर्षक रूपांनी राख्यांवर साकारला आहे. बच्चे कंपनीसाठी ऐटदार अशा कार्टून कॅरेक्‍टर छोटा भीम, डोरेमॅन, स्पायडरमॅन, मिकी माऊस, बॉबी, टॉम ऍण्ड जेरी, अंग्री बर्ड, बालगणेश, कृष्ण याचबरोबर विविध सिनेमांची लेबल असलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. गोंडा, कुंदन, खड्यांच्या, रुद्राक्ष, रत्न, सोने, चांदीचे वर्ख दिलेल्या विविध प्रकार व रंगीबेरंगी राख्यांनी संगमनेरची बाजारपेठ सजली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.