ShortFilm News : ‘इनिग्मा- द फॉलन एंजल’ शोर्ट्फिल्मचे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यश

एमपीसी न्यूज: मराठमोळ्या अभय ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि मराठी कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘इनिग्मा- द फॉलन एंजल’ (Enigma – The Fallen Angel ) या शॉर्टफिल्मला ( Shortfilm)  विविध आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये ( International short Film Festival) गौरवण्यात आले.

ड्रीम कॅचर मोशन पिक्चर कंपनी, स्नोफ्लेक स्टुडिओजनी ह्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.

ह्या शॉर्टफिल्मची कथा व संवाद हे अर्जुन प्रधान यांचे असून अभय ठाकूर व अजित ठाकूर यांनी पटकथा व संवाद यामध्ये योगदान दिले आहे.

फिल्मची सिनेमॅटोग्राफी आशीष मेस्त्री यांची आहे. या शॉर्टफिल्ममध्ये रुचिता जाधव, यतीन कार्येकर, अनन्या सेनगुप्ता, शंतनु मोघे, मीरा पाथरकर, रणजीत जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वर्ल्ड फिल्म कार्निव्हल, सिंगापूर, कोलकाता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, इस्टर्न युरोप इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डस, टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवांमध्ये अनुक्रमे सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व सर्वोत्कृष्ट अभिनेता असे 3 पुरस्कार या शॉर्टफिल्मने मिळवले आहेत.

ही शॉर्टफिल्म युरोपियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी तसेच युरोपियन सिनेमॅटोग्राफी ॲवॉर्ड, ॲमस्टरडॅम फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्टफिल्म अंतिम टप्प्यापर्यंत पोचली आहे.

रूवती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट लेखन, यतीन कार्येकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि शंतनु मोघे यांना ज्यूरी स्पेशल अवॉर्ड अशा 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. International Arthouse Film Festival, पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डस आणि ओनिरस फिल्म अवॉर्डस मॅनहॅटन, न्यूयॉर्क या ठिकाणी ‘इनिग्मा’ची निवड झाली आहे.

मी ड्रीम कॅचर या कंपनीच्या माध्यामातून मागील कित्येक वर्षे व्हीज्युयल इफेक्ट्स क्षेत्रात कार्यरत आहे. प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्याच्या हेतूने मी ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले. ही 40 मिनिटांची एक सायकॉलॉजीकल थ्रिलर फिल्म असून यांत आम्ही मानसिक आरोग्यावर भाष्य केले आहे.

या शॉर्टफिल्मला मिळालेले पुरस्कार हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे यश आहे. स्नेहल ठाकूर, प्रसाध चव्हाण, अभिजीत कोकाटे यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी हे यश मिळविले असल्याचे निर्माता, दिग्दर्शक अभय ठाकूर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.