Pimpri : पालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवा, नागरिकांची मागणी

एमपीसी  न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा सतत वादळी ठरत असताना या सभेचे शहरातील स्थानिक वृत्तवाहिनीवरून नागरिकांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. थेरगावातील संजय गायके या नागरिकाने तसे पत्र महापौर राहूल जाधव यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांना दिले आहे.

संजय गायके यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या मासिक सभेचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिकांना तिस-या मसल्यावर सोय आहे. परंतु, ती तुटपुंजी असल्याने तेथे नागरिकांना जाता येत नाही. शहरात आपण निवडून दिलेले नगरसेवक सभागृहात काय करतात ? कोणते प्रश्न मांडतात ? कशावर चर्चा करतात ? तसेच, नगरसेवक फक्त भत्ता घेण्यासाठी सभेला हजेरी लावतात का ? हे नागरिकांना घरबसल्या समजण्यासाठी सभेचे कामकाज स्थानिक केबल टीव्हीच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जावे. ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गायके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.