Vadgaon Maval : ‘तानाजी’ सिनेमाचे तिकीट दाखवा आणि जेवणात दहा टक्के सूट मिळवा !

एमपीसी न्यूज- सध्या गाजत असलेल्या अजय देवगण यांची भूमिका असलेला ‘तानाजी’ सिनेमा पाहिल्याचे तिकीट दाखवा आणि जेवणाच्या थाळीवर दहा टक्के सूट मिळवा. अशी दणदणीत आॅफर हाॅटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांनी खवय्ये मंडळींना दिली आहे.

सध्या ‘तानाजी ‘ सिनेमाला तरूणाईने डोक्यावर घेतले आहे. पुण्यातील सिंहगड किल्ला (पूर्वीचे नाव कोंढाणा) जिंकताना तानाजी मालुसरे यांनी गाजविलेले शौर्य व बलिदान इतिहासात अजरामर झाले आहे. प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांनी आपल्या अभिनयाद्वारे तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. आपल्या महाराष्ट्राची व पर्यायाने पुण्याचे नाव उंचावण्याची कामगिरी झाल्याबद्दल वडगाव मावळ येथील हाॅटेल व्यावसायिक अतुल वायकर कमालीचे खुश आहेत. त्यामुळे जर तुम्ही ‘तानाजी’ सिनेमा पाहिला असेल तर अतुल वायकर यांनी तिकीट दाखवून खवय्ये मंडळींना जेवणात दहा टक्के सवलत देण्याचे ठरवले आहे.

नाॅनव्हेज खाणा-या मंडळींसाठी केवळ मावळच नव्हे तर पुणे शहरातून खास नाॅनव्हेजवर ताव मारण्यासाठी हाॅटेल शिवराजमध्ये खवय्ये मंडळी येत असतात. पुणे- मुंबई हायवेवर हॉटेल असल्यामुळे कायमच या ठिकाणी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. चविष्ट पदार्थ आणि तत्पर सेवा यामुळे हाॅटेल शिवराज अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.

अतुल वायकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करीत असतात. मावळातील आदिवासी भागातील लोकांना कपडे वाटप करणे, कुपोषित बालकांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे, गरीबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून दिवाळीत फराळाचे वाटप करणे, दुर्गम भागातील आदिवासी व दुर्लक्षित वस्तीवर जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा पुरविणे, वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, वृक्ष लागवड, गड किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, अनाथांना आश्रय देणे; तसेच सामाजिक समस्या व अन्यायाविरुद्ध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन जाब विचारणे आदी सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. आता तानाजी सिनेमा पाहणाऱ्यांना जेवणामध्ये 10 टक्के सवलत देण्याचे ठरवून त्यांनी तानाजी मालुसरे यांचा इतिहास जास्तीतजास्त लोकांनी पाहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.