Shradhdha Kapoor’s Marathi Letter : श्रद्धाचे चाहत्यांना मराठीत आभारपत्र

Thank you letter in Marathi to Shraddha fans

एमपीसी न्यूज – विविध विषयांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, त्यात साकारलेला उत्तम अभिनय आणि देखणा चेहरा यामुळे अगदी थोड्या कालावधीत तिने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या श्रद्धा कपूरने आपले मराठीशी असलेले नाते जपून ठेवले आहे. तिची आई शिवांगी ही मराठी आहे आणि लता मंगेशकर यांच्या नात्यातील आहे. पद्मिनी कोल्हापुरे श्रद्धाची मावशी.

श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. मराठी बाणा जपणा-या श्रद्धाने नुकतेच मराठीमध्ये पत्र लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

श्रद्धाचे काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे मराठीमध्ये ट्विट करत तिने पोस्ट लिहिली आहे. ‘माझे सर्व चाहते, फॅन क्लब आणि हितचिंतक… तुम्ही प्रेमाने बनवलेले व्हिडीओ आणि पोस्टर पाहून माझे मन भारावले. तुमच्या सर्वांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरभरुन प्रेम. असेच सुखी रहा आणि आनंदी रहा. तसेच कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांशी प्रेमाने रहा. धन्यवाद ५० मिलियन वेळा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीसोबतच तिने हिंदी आणि इंग्रजीमध्ये पत्र लिहित चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या इन्स्टाग्रामच्या सर्वाधिक फॉलोअर्स यादीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्या क्रमांकावर आहे. तिचे ५४.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर दीपिका पदुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे ५०.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता श्रद्धा कपूरने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तिचे ५०. १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

🙏🦋🦄 🌻💫💜

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.