Pimpri : कोरियन विद्यार्थ्यांचे स्वच्छतेसाठी श्रमदान

एमपीसी न्यूज – दक्षिण कोरिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संभाजीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात “सेव्ह टू अर्थ’ हा उपक्रम राबवत श्रमदान करुन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या विद्यार्थ्यांनी पृथ्वीचे संवर्धन, जगभरातील वाढते प्रदूषण याबाबत जनजागृती केली.

यावेळी, शिक्षण, स्वच्छतेचे महत्त्व, प्रदूषणाचे दुष्परिणाम आदी विषयावर विद्यार्थ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या उपक्रमात दक्षिण कोरियातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. भारतातील बंगळुरू, मुंबई या शहरात स्वच्छतेविषयक उपक्रम राबविल्यानंतर विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराची निवड केली आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 20 ऑगस्ट या कालावधीत देशभरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच, या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करुन सामाजिक व पर्यावरणविषयक संदेश दिला. या उपक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.