Pimpri : महापालिका इतिहासातील श्रावण हर्डीकर सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त – खासदार बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या राजवटीत अधिका-यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. त्याची जबाबदारी आयुक्तांचीच आहे. त्यांचा प्रशासनावर वचक आणि नियंत्रण नाही. महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त हर्डीकर असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. तसेच त्यांच्या बदलीची मागणी न करता दुरुस्ती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेत आज (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना खासदार बारणे म्हणाले, आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. आजपर्यंत श्रावण हर्डीकर यांच्या इतका निष्क्रिय आयुक्त कधीच पाहिला नाही. शिवसेना चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाही. चुकीचे काम करणा-यांना कधीच साथ दिली जात नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेडसह पाणीपुरवठ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत केली जाईल. आयुक्तांच्या बदलीची मागणी करणार नाही. दुरुस्ती करणार आहे, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.