Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन संस्थेच्या नवीन युवा शाखेची स्थापना

शपथ विधी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज :  श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन नवी दिल्ली युवा विभागाच्या युवा जोडो अभियान अंतर्गत व संदेश गादिया, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यची शपथ विधी होताच (Pimpri) पिंपरी-चिंचवड मध्ये नवीन शाखेची स्थापना नुकतीच करण्यात आली.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्रायोजक तपचंद्रिका श्रीमती मीराबाई लुणिया, विशेष सहयोग रवींद्र बाफना व संघ सहयोग जैन स्थानक चिंचवड स्टेशन आणि जैन कॉन्फरन्स चे पदॎधिकारी सुभाष ललवानी , राजेंद्र लुंकड ,प्रा प्रकाश कटारिया ,सुरेश गदिया व मनीषा लुंकड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Pune Rural Police Recruitment : लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची कट ऑफ यादी जाहीर

काॕन्फरन्सचे निवर्तमान उपाध्यक्ष प्रा अशोककुमार पगारिया यांनी आपल्या भाषणात कॉन्फरन्सच्या समाज सेवा ,संतसेवेच्या विविध योजनांची माहिती दिली ,सुभाष ललवानी व प्रा प्रकाश कटारिया यांनी ही युवकांना मार्गदर्शन केले ,सुरेशजी गदिया यांनी सूत्रसंचालन केले ,जयकुमार ओस्तवाल यांनी आभार मानले  (Pimpri),संदेश गदिया यांनी संयोजन केले.  या वेळी काॕन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी राजेंद्र लुंकड यांनी संदेश गदिया आणि जयकुमार ओस्तवाल यांना शपथ दिली व जयकुमार यांनी विनायक बाफना (उपादयक्ष), विशाल कोठारी ( उपादयक्ष), मनोज शेलोत (सचिव), शुभम कटारिया (सह सचिव), रविंद्र बाफना यां युवकांनी शपथ ग्रहण केली.

या कार्यक्रमास सर्व जैन समाजातील विविध युवा शाखेतील संघटना चे सदस्य, आकुर्डी ,चिंचवड स्टेशन श्रावक संघाचे व जैन महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.