Loni : 36 वर्षानंतर पुन्हा भरला इयत्ता दहावीचा वर्ग

एमपीसी न्यूज : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा असणाऱ्या श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी विद्यालयातील (Loni) 1986 साली दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नुकताच लोणी येथे विद्यालयात विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व विद्येची देवता सरस्वतीच्या पुजनाने आपलेच सहकारी माजी सैनिक व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते. तसेच 1986 साली दहावीसाठी असणारे सर्वच आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या सहकारी मित्रमैत्रिंणीना पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याचा आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीमुळे विशेष आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना सर्वांनी व्यक्त केले. सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला .तर 1986 साली दहावीत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाला लोणी च्या 1986 च्या एसएससी बॅचचे एकूण 50 माजी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातुन आज स्नेहसंमेलनाच्या रूपाने पुन्हा एकत्र आले होते. बालमैत्री स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पुन्हा वृद्धिंगत केली. 1986 साली या विद्यालयातून पास झालेले हे विद्यार्थी आज यशाची गरुडझेप घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर झाले आहेत.

Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आरोग्य शिबीर तसेच गरजू मुलांसाठी अन्नदान

या शाळेतील शिक्षकांचे प्रती त्यांची असलेली प्रेम भावना व शाळेने दिलेल्या संस्काराच्या जोरावर यशाची गगणभरारी घेतल्याच्या भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने 10 वी नंतरचा आपला प्रवास व कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन आपल्या सवंगाड्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने देणगी स्वरूपात रुपये …. जमा केली. भविष्यामध्ये अशा प्रकारचे मेळावे प्रतिवर्षी आयोजित करून शाळेसाठी मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांप्रती व्यक्त केले.

या कार्यक्रमाला अन्नदाता सुखी भव,अन्न हे पुर्णब्रम्ह असे सुखद मस्त मासवडी, भाकरी, आमटीचे जेवण दानशूर व्यक्तिमत्व विलास वाळुंज यांनी दिले.सर्वांनी जाताना निश्चय केला की पुढील वेळेस सर्वांनी जास्तीजास्त संख्येने उपस्थित राहून  कार्यक्रमाचा आनंद घेउयात.

स्नेहसंमेलनामध्ये आत्ता आजी-आजोबा असलेले त्यावेळीचे विद्यार्थी हेमांगी कुलकर्णी, संगिता सुक्रे, सरिता भागवत, सपना पारख, नंदा सुक्रे, कौसल्या वाळुंज, जयश्री लेंडघर, सुहासिनी पापत, चांगुणा सिनलकर, नवनीत सिनलकर , अरुण गुळवे, विलास वाळुंज, शरद वाळुंज, अर्जुन गायकवाड, (Loni) विठ्ठल वाळुंज, काळूराम आदक, तुकाराम पोखरकर, ज्ञानेश्वर वाळुंज, उदय डोके, बाळासाो वाळुंज , मच्छिंद्र आढाव, अंकुश लंके, मुनीर मोमीन , रंगनाथ विटकर, शेरअहमद पठाण, सोपान आदक, अशोक पोखरकर, नामदेव वाळुंज, पांडुरंग गायकवाड, रामचंद्र सिनलकर, संजय ल सिनलकर, अनिल शिंदे, रंगनाथ ब. वाळुंज, कैलास तु. सुुक्रे, अनिल खराडे, भीमराव गायकवाड, वसंत भागवत, बन्सीलाल सिनलकर, दिलीप सिनलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत सिनलकर यांनी केले तर अरुण गुळवे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवनीत सिनलकर याने अथक परिश्रम घेतले व त्याला आपल्या सर्वच जणांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.