Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. (10वी) माध्यमिक परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2 जून रोजी जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा (आळंदी) निकाल 99.69 टक्के लागला.
सदर परीक्षेत एकूण 324 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये 323 विद्यार्थी पात्र झाले. विद्यालयात सृष्टी जीवन पांचाळ या विद्यार्थिनीने – 485/500 (97.00%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. कृष्णा गणेश चव्हाण याने – 477/500 (95.40%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर वेदांत रवींद्र भालेराव याने – 476/500 (95.20%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच दरवर्षीप्रमाणे दिव्यांग विभागाचा याही वर्षी 100% निकाल लागला असून त्यामध्ये पूजा विठ्ठल शिंदे या विद्यार्थिनीने  407/500 (81.40%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. विद्या भरत साबळे हिने – 401/500 (80.00%) व लक्ष्मी संतोष गीते हिने 401/500 (80.00%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर स्नेहल संजय कतरे हिने – 398/500  (79.60%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे, इयत्ता 10 वीच्या समन्वयक अनिता गावडे, गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख नारायण पिंगळे व गुणवत्ता वाढ व विकास समितीचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व खजिनदार डॉ. दिपक पाटील यांनी सर्व संस्थेच्या वतीने व विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे व उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
https://youtu.be/guYSCjSMRvQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.