Lonavala : श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या 4 जागांचा निकाल जाहीर; देवकर, पडवळ, देशमुख विजयी

एमपीसी न्यूज  : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशी विविध जाती धर्मीयांची कुलस्वामी असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा आई च्या मंदिर देवस्थान ट्रस्टच्या चार जागांसाठी रविवारी (26 फेब्रुवारी) मतदान होऊन रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. (Lonavala) यामध्ये देशमुख परिवारातील दोन पदसिद्ध जागांवर देशमुख निवडून आले तर स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. यामध्ये सागर मोहन देवकर व विकास काशिनाथ पडवळ यांनी बाजी मारली आहे.

सागर देवकर यास 330 तर विकास पडवळ ला 309 मते मिळाली. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख यांना 110 तर महेंद्र देशमुख 22 मते घेत विजयी झाले. देवस्थानच्या तीन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये गुरव तक्षिणेतील नवनाथ रामचंद्र देशमुख, पुजारी या पदसिद्ध जागेवर संजय बाळकृष्ण गोविलकर व सरपंच या पदसिद्ध जागेवर अर्चना संदीप देवकर हे बिनविरोध निवडून आले होते.

मुंबई सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील एस.एच.पारच यांनी या निवडणुकीत निरीक्षक तथा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.(Lonavala) मागील पाच वर्षापूर्वी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सदरचा ट्रस्ट बरखास्त करत येथील कारभार प्रशासनाने ताब्यात घेतला होता.

Alandi News : आळंदी देवाची सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 26 मार्चला होणार

मात्र देवीच्या वर्षात दोन वेळा भरणार्‍या यात्रा व वर्षभर गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रशासन येथे लक्ष देण्यास कमी पडत असल्याने पुर्णवेळ कामकाज पाहण्यासाठी येथे ट्रस्ट गरजेचे असल्याने देवस्थानच्या घटनेतील तरतुदी नुसार सदरच निवडणूक घेण्यात आली होती. राज्यभरातील भाविक यामधून दोन विश्वस्त नेमण्याची प्रक्रिया देखील लवकरच पुर्ण होऊन याठिकाणी पुर्ण विश्वस्त मंडळ निर्माण होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.