Chikhali News : श्री गजानन बाल संस्कार केंद्राच्या वतीने गुढीपाडवा नव वर्षाचे स्वागत

एमपीसी न्यूज – गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त (Chikhali News) श्री गजानन बाल संस्कार केंद्राच्या वतीने नेवाळे वस्ती व मोशी या दोन ठिकाणी शोभयात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेत लहान बालक कोणी राम, सीता, हनुमान अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेची सुरुवात श्री दत्त कृपा सोसायटी नेवाळे वस्तीपासून होऊन  ग्रीन इमपायर सोसायटी, जयहिंद सोसायटी, रागा, होम्स, सोसायटी, रागा आंगण सोसायटी, अक्षरधाम सोसायटी बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल या मार्गे शोभायात्रा काढण्यात आली.

 

Pimpri News – पिंपरीच्या बाबा गोविंदराम झुलेलाल मंदिर येथे चेतीचंद उत्सव आयोजित

शोभ यात्रेत नांगरिकांचा सुद्धा मोठा सहभाग होता. सर्वांच्या हाती भगवे झेंडे तसेच जनजागृती विषयी असलेले फलक घेऊन जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम, (Chikhali News) भारत माता की जय, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अशा घोषणा देत शोभा यात्रा पार पडली. शेवटी सर्वांना सरबत, केळी आणि पेढे देऊन शोभायात्रेचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.