Pune : मानाचा पहिला श्री कसबा गणपती अलका चौकात दाखल

एमपीसी न्यूज – मानाचा पहिला श्री कसबा गणपती अलका चौकात दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी दाखल झाला.

मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या पूजनाने आज सकाळी साडेदहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर बेलबाग चौकातून ढोल-ताशा पथके सहभागी झाली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर ढोल-ताशा सादर करीत कसबा गणपती वेळेच्या दहा मिनिटा पूर्वीच दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी अलका चौकात दाखल झाला. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून कसबा गणपतीचे स्वागत करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.