IND Vs NZ 1st Test : श्रेयसने कसोटी पदार्पण केले ‘अविस्मरणीय’

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) –  आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकून आपले पदार्पण अविस्मरणीय करत भारतीय फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवून श्रेयस अय्यरने आज विराट कोहलीच्या जागी मिळालेल्या संधीचे सोनं करून आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले आहे.

हा विक्रम करणारा तो जगातला 112 वा, तर भारताचा 16 वा कसोटीवीर ठरला आहे. लाला अमरनाथ, मोहम्मद अझरूद्दीन, सेहवाग, विश्वनाथ, रोहीत या महान फलंदाजाच्या जोडीने यापुढे श्रेयस अय्यरचे नाव क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल.

कालच्या 258 वर चार या धावसंख्येवरून आज पुढे खेळताना कालचा दुसरा नाबाद फलंदाज रवींद्र जडेजा कालच्या आपल्या वैयक्तिक धावसंख्येत काहीही भर न घालता बाद झाल्यानंतरही श्रेयसने आपल्या एकाग्रतेला भंग न होऊ देता खणखणीत पाच चौकार मारत आपल्या पहिल्या शतकाला गवसणी घातली

शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारतीय संघाच्या 291 वर सहा धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यर 104 तर आर अश्विन 3 धावांवर खेळत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.