Pimpri: औद्योगिकनगरीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (बुधवारी)पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात रॅली काढण्यात आली. राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांकडून महाराजांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतीमेस महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी, दापोडी, भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पांजली अर्पण केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे खराळवाडीत मध्यवर्ती कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.  ॲड. गोरक्ष लोखंडे, शकुंतला साठे, सतिश दरेकर, प्रकाश सोमवंशी, श्रीधर वाल्हेकर, कविता खराडे, मनिषा गटकळ, पुष्पा शेळके, विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे,  विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील एच. ए. कंपनीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर, युवक काँग्रेसच्या वतीने  “रयतेचा राजा” या पॉकेट पुस्तिकेचे मोफत वाटप करून युवा प्रबोधनात्मक उपक्रम राबविला.  सुमारे 600 पुस्तिका वाटल्या.  शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अशोक मोरे, मनोज कांबळे, अभिमन्यू दहितुले, बनसोडे, अशोक काळभोर, सचिन कोंढरे उपस्थित होते. तर, सुदाम ढोरे, मयुर जयस्वाल, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, मकरध्वज यादव, अनिरुध्द कांबळे, मोहन अडसूळ, संदेश बोर्डे, गौरव चौधरी उपस्थित होते.

रायरेश्वर प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगरसेवक एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच कृष्णानगरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. चिंचवड, शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, प्रकाश शिंदे, कैलास सराफ, भीमराव पाटील, श्रीकांत लोमटे, अर्चना तोंडकर, अंजली देव, मनीषा देव, सविता राणे, अश्विनी शिंदे उपस्थित होते.

सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जिजामाता व शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन करण्यात आली. मुख्याध्यापिका हर्षा बांठिया व मुख्याध्यापिका गीता येरूणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनींनी पाळणा गात नृत्य सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.