Pune: श्रीराम पूजन, आरती आणि पेढे वाटप करून भाजपच्या शहर कार्यालयात जल्लोष

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते गुढी उभारून, श्री राम पूजन, आरती आणि पेढे वाटप करून शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे बहुप्रतिक्षित श्री राम जन्म भूमी मंदिराचे भूमिपूजन आज (दि.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. त्याप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. भाजप पुणे शहराच्या वतीने आज शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते गुढी उभारून, श्री राम पूजन, आरती आणि पेढे वाटप करून शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘शेकडो वर्षांची तपश्चर्या आज फळाला येत आहे, पावणे पाचशे वर्षांच्या संघर्षाचे यश आजच्या भूमिपूजनातून दिसून येत आहे.

या वेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, अनुसूचित मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, युवा मोर्चा संपर्क प्रमुख बापू मानकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे पुणे शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.