Shri Sammed Shikharji : पारसनाथ सम्मेद शिखर परिसरात आता मांस व दारु विक्रीस बंदी,  केंद्र सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज –  झारखंड येथील जैन धर्मिय समाजाचे पवित्र स्थान ( Shri Sammed Shikharji ) मानल्या जाणाऱ्या पारसनाथ सम्मेद शिखर परिसरात व आसपास मांस  व दारु विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सराकारने घेतला आहे. तसे निर्देश देखील झारखंड सरकारला देण्यात आले आहेत.

2019 साली झारखंड सरकारने सम्मेद शिखरला इको सेन्सीटीव्ह झोन चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला जैन सामाजाने कडाडून विरोध केला होता. जैन बांधवाच्या मते सम्मेद शिखर जर पर्यटन स्थळ बनले तर तेथे नागरिक येवून पिकनीक करतील, दुकाने होतील यामुळे स्थळाचे पावित्र्य निघून जाईल. त्याचप्रमाणे सध्या मंदिर परिसराच्या आसापास असणाऱ्या दारु व मांस विक्रीच्या दुकानावर ही बंदी घालण्यात यावी अशी मागणी जैन समाजाने झारखंड व केंद्र सरकारकडे केली होती. यासाठी संपूर्ण देशभरातून जैन बांधव या मागणीसाठी आंदोलन करत होते.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकानेही जाळपोळ , आत्महत्या करायची नाही- मनोज जरांगे पाटील

जैन बांधवांच्या या धार्मिक भावनांचा विचार करता केंद्र सरकारने सम्मेद शिखर मंदिर परिसरात व जवळ पास मांस, दारु किंवा इतर नशेचे पदार्थ विक्री करण्यास मनाई केली आहे. तसेच मंदिर परिसरात आता मोठ्या आवाजात संगीत किंवा इतर आवाज करण्यास मनाई केली आहे. सुरुवातीला मंदिर परिसर हा पर्यावर्णीय पर्यटन क्षेत्र बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तो निर्णय देखील केंद्र सरकारने रद्द केला आहे. याबरोबरच परिसराच्या आसापास ज्या नैसर्गिक सुंदर जागा आहेत तेथे ही कॅम्पींग करणे व ट्रेकींग करण्यास मनाई केली आहे. पाळीव प्राणी परिसरात नेण्यास मनाई आहे.

येथे टुरीझम झाले तर लोक येथे येऊन स्थळाचे पावित्र्य व शांतता तसेच स्वच्छता भंग करतील ते होऊ नये यासाठी जैन बांधव झारखंड सरकारच्या निर्णया विरोधात लढा देत होते. अखेर त्यांच्या मागणीला व आंदोलनाला यश आले असून केंद्र सरकारने परिसरात मांस, दारु, नशेचे इतर पदार्थ सेवन व विक्री करण्यास बंदी केली आहे.

तसेच परिसरात तोकडे कपडे वापरणे, मोठ्या आवाजात संगीत किंवा इतर गोंधळ घालणे, सहली, पर्यंटन यास बंदी घातली आहे. तसेच सरकारच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी एक कमिटी देखील नेमण्यात आली आहे. यात दोन सदस्य कायम स्वरूपी सदस्य असतील जे जैन समाजातील असतील.

काय आहे सम्मेद शिखर परिसराचे महत्त्व

जैन धर्मातील सर्वात पहिले तीर्थकर ऋषभदेव, बारावे तीर्थकर वासुपूज्य, 22 वे नेमीनाथ आणि 24 वे तीर्थकर वर्धमान महावीर यांना सोडून बाकीच्या सर्व 20 तीर्थकारांना मोक्षप्राप्ती झाली ती याच ठिकाणी. जैन धर्माचे 23 वे तीर्थकर पार्श्वनाथ यांना याच ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली होती.याच कारणामुळे जैन समाजासाठी हे स्थान पवित्र आहे. जैन धर्मशास्त्रातील श्री सम्मेद शिखराबाबतच्या मान्यतेनुसार, येथे एकदा तीर्थयात्रा केल्यावर मनुष्याला पशुयोनी आणि मृत्यूनंतर नरक मिळत नाही, असे म्हटले ( Shri Sammed Shikharji ) जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.